कार्यानुभ विषयांचा इतर विषयांशी समन्वय |
१.समन्वय :
कृती करीत असतांना विविध विषयाचे ज्ञान मिळवणे म्हणजे समन्वय होय.समन्वय म्हणजे अनुबंध होय.
|
२.गणित व कार्यानुभव यांचा संबंध :
कार्यानुभवात कोणतीही कृती करायची तर मापन आलेच कागदाची किंवा पुठ्ठा काम,मातकाम किंवा शेती,शिवणकाम,विणकाम,लाकूडकाम,काथ्याकाम,अनेक अनेक उपक्रमात विविध प्रकारे मापे घ्यावे लागतात त्याशिवाय कार्यानुभवातील कोणतीच कृती व्यवस्थित होणार नाही.म्हणून कार्यानुभव व गणिताचा संबंध जवळचा आहे.
|
३.कार्यानुभव व विज्ञान यांचा संबंध :
कार्यानुभव व विज्ञान ही विषय एका आईच्या दोन मुलाप्रमाणे आहेत.कारण आई ला जशी आपली दोन्ही मुले सारखे वाटतात.त्याच प्रमाणे कार्यानुभव शिवाय विज्ञान व्यवस्थित आकलन होणार नाही व विज्ञान शिवाय कार्यानुभवाचा उपक्रम करता येणार नाहीत .कार्यानुभव व विज्ञान एकच आहे असे म्हटले तरी चालेल फक्त कार्यानुभवात विज्ञानातील अनेक गोष्टी कृतीतून केल्या जातात.उदा-ग्राम सफाई ,शोषखड्डा ,कपोस्ट खताचे खड्डे ,वनमहोत्सव साजरा करणे,व दतक वृक्षाची कल्पना राबविणे,निरोगी सवयीवर सकस आहारासाठी आरोग्यकेंद्र चालवणे व परसबाग इत्यादी उपक्रमातून विद्यार्थाची विज्ञान निष्ठा वाढीस लागते म्हणून कार्यानुभव व विज्ञान यांचा संबंध अतूटचा आहे.
|
४.कार्यानुभवच्या उपक्रमातून शैक्षणिक साधनाची निर्मिती:
१.कागद काम किंवा पुठ्ठाकाम : तक्ते ,भूमितीसाठी,आकृत्या .
२.शेती किंवा मातकाम : बियांचा संग्रह व पाना फुलाचा संग्रह .
३.शिवणकाम : सांस्कृतीक कार्यक्रमासाठी पडदे शालेय स्नेह संमेलनसाठी बिल्ले ,बाहुल्या तयार करणे.
४.वीणकाम : स्वच्छतेसाठी रुमाल,खादी फलक.
५.लाकूडकाम : फळ्यासाठी डस्टर ,भूमितीसाठी कंपास पेटीतील सगळे साधने.
६.काथ्याकाम: वर्ग सजावटीसाठी काथ्यातुन विणलेले भीती चित्रे . |
मुख्य पृष्ठ |