karyanubhav_1

topics3
कार्यानुभवाची तात्वीक व सामाजिक बैठक

१.कार्यानुभवाचे शिक्षणक्रमातील स्थान
१.प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात कार्यानुभव हा विषय १९८८ साली समाविष्ट करण्यात आला.
२.इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी निम्न प्राथमिक स्तर २० टक्के तासिका.
३.इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी उच्च प्राथमिक स्तर १२ टक्के तासिका.
४. इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी निम्न प्राथमिक ४५ तासिका पैकी ९ तासिका.
५. इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी उच्च प्राथमिक स्तर ४५ तासिका पैकी ५ तासिका.
२.कार्यानुभवाची ऐतिहासिक पार्श्वभूमी :
१.कृतीद्वार शिक्षण .
२.ग्रामोद्योगी राष्ट्रीय शिक्षण पद्धती .
३.वर्धा शिक्षण पद्धती –हुमायुन कबीर .
४.मलोद्योगी शिक्षण पद्धती –महात्मा गांधी.
५.उद्योगातून शिक्षण .
६.उद्योगमुलक शिक्षण .
७.पायाभुत शिक्षण .
८.जीवन शिक्षण पध्दती –आचार्य विनोबाजी भावे.

३.कोठारी आयोगाची स्थापना १९६४ मध्ये त्याचे कार्यानुभव संबंधी विचार :
१.शाळा,घर ,कार्यशाळा ,शेत ,कारखाने इतर उत्पादन विषयक उत्पादन कार्यात सहभागी होणे म्हणजे कार्यानुभव .
२.कृती केंद्रित विशाल पायाभुत सामान्य शिक्षण .
३.कार्यानुभव म्हणजे कृती करत असतांना मिळालेल्या अनुभव .
४.कार्यानुभव विषय मानसशास्त्रीय सिद्धावर आधारित आहे.

४.ईश्वरभाई पटेल समितीची स्थापना १९७७ मध्ये तिचे कार्यानुभव संबंधी विचार .
१.इयत्ता १ ली ते इयत्ता १० साठी ईश्वरभाई पटेल समिती.
२.इयत्ता ११ वी ते इयत्ता १२ मालकम अदिशेषय्या समिती.

हेतुपूर्वक व अर्थपूर्णपणे केलेल्या ज्या ज्या कार्याचा परिणाम अंती समाज उपयोगी उत्पादन कार्यात होतो त्यांना समाजउपयोगी उत्पादन कार्य म्हणतात.



५.कार्यानुभव म्हणजे व्यवसायीक शिक्षण नव्हे:
१.फेडलबोर्ड ऑफ एज्युकेशन :मजुरी मिळवीत असलेल्या मजुरांना दिले जाणारे व्यवसायाचे ज्ञान .
२.दी प्रेसिडेंट अडव्हायझरी कमेटी ऑन एज्युकेशन ज्या अनुभवाद्वारे एखादा व्यवसाय यशस्वीरीत्या पार पडता यईल.
३. दी कमेटी ऑफ अमेरिकन व्होकेशनल : शिक्षण कौशल्य ,आकलनक्षमता, ज्ञान बदल ,अभिरुची व कल याचा विचार करून मजुरांना एखाद्या व्यवसायात प्रगती करण्यात साह्यभूत शिक्षण .
४.व्होकेशन एज्युकेशन अक्ट : व्यक्तील व्यवसायात अर्धकुशल वा कुशल किंवा म्हणून उपजीविकेचे साधने प्राप्त करण्यासाठी दिले जाणारे शिक्षण .

६.कार्यानुभव शिक्षण व व्यवसाय शिक्षण फरक :
१.कार्यानुभवाचे उद्दिष्टे व्यापक आहेत,व्यवसायाची पूर्वतयारी म्हणून अभ्यासक्रमात स्थान व व्यवसायाचे उद्दिष्टे मर्यादित आहेत ,एखादा व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्यावर अधिक भर असतो.
२.कार्यानुभव शिक्षणाचा अभिभाज्य घटक म्हणून शाळेत शिकविला जातो व व्यावसायीक शिक्षणाचे स्थान ऐच्छिक व वैकल्पिक असते.
३.कार्यानुभवात व्यक्तीच्या संतुलित विकासास महत्व आहे. व व्यवसाय शिक्षणात आर्थिक दृष्टीकोनास महत्व आहे.
४.कार्यानुभव व्यवसाय शिक्षणाची पूर्वतयारी करून देतो म्हणून मानसिक प्रक्रिया आहे. व व्यवसाय शिक्षण मात्र कला नुसार व्यवसायाची निवड करावी लागत म्हणून शारीरिक प्रक्रिया आहे.

७.कार्यानुभव शिक्षण व मलोद्योगी शिक्षण फरक :
१.कार्यानुभवातुन विद्यार्थात प्राथमिक कौशल्य निर्माण व्हावे म्हणून शाळा मध्ये शिकवला जातो. व मलोद्योग म्हणजे आपल्या अन्न,वस्त्र,निवारा ,गरजा,भागण्यासाठी मा.गांधी याने शिवणकाम ,विणकाम ,सुतारकाम शेती इत्यादी मलोद्योग करणे.
२.कार्यानुभव व्यवसाची पूर्वतयारी करून देतो. व मलोद्योग उदारनिर्वायाचे साधन आहेत.

८.श्रममुलक उपक्रमातून व्यक्ती विकास :
१.शारीरिक काम व कामकारणारे लोक याबद्दल आदर .
२.शिक्षणात समाजात बद्धीजीवी व श्रमजीवी असे दोन वर्ग पडले आहे.
३.राष्ट्रीची विकास : राष्ट्राचा विकास व्यक्ती विकासावर अवलंबून आहे म्हणून व्यक्ती विकासामध्ये श्रमनिष्ठा या मूल्याचा परिणाम होणे आवश्यक आहे.
४.कार्यानुभवात श्रममुलक स्वरूपाचे उपक्रम ठेवले आहेत.

९.श्रम-मुलक उपक्रमातून सामाजिक विकास :
१.स्वच्छता : ग्रामसफाई ,शाळासफाई,क्रीडांगणसफाई,पाणवठ्याजवळी सफाई,इत्यादीतुन स्वच्छेचे महत्व पटून विद्यार्थात सामाजिक विकास होतो .
२.निसर्ग प्रेम : बागकाम,वृक्षारोपण ,पानाफुलांचासंग्रह इत्यादी उपक्रमातून निसर्ग प्रेम निर्माण होते.
३.स्वालंबन : कार्यानुभवात काही उपक्रम प्रत्यक्ष करतांना विद्यार्थात स्वालंबनाची भावना निर्माण होते.
४.विज्ञान निष्ठा : ग्रामसफाई ,शोषखड्डा ,कंपोस्ट खताचे खड्डे ,वन महोत्सव साजरा करणे व दतक वृक्षाची कल्पना राबविणे ,निरोगी सवयी व सकस आहार मिळण्यासाठी आरोग्यकेंद्र चालविणे ,परसबाग इत्यादी उपक्रमातुन विद्यार्थांची विज्ञान निष्ठा वाढीस लागते.
१०.श्रममुलक उपक्रमातुन कोणत्या सामाजिक मूल्याचा परिपोष :
१.कर्तव्य दक्षता : ग्रामसफाई ,शाळासफाई ,क्रीडांगणसफाई ,पाणवठ्याजवळील सफाई इत्यादी उपक्रमातुन विद्यार्थात कर्तव्यदक्षता हे मूल्य येते.
२.सहकार्य : कार्यानुभवात काही उपक्रम सामुहिकरीत्या करावे लागतात म्हणून विद्यार्थात सहकार्याची भावना निर्माण होते.
३.समता : आपल्या राष्ट्रीय मूल्य म्हणजे समता,स्वतंत्रता ,बंधूता ,सहविष्णुता इत्यादी मुल्यातून समता हे मूल्य विद्यार्थात कार्यानुभव मुळे येते.
११.प्राथमिक शाळेतील कार्यानुभव विषयाचे ठळक वैशिष्टे :
१.श्रम-मुलक कार्याची सवय: विद्यार्थात श्रमनिष्ठा निर्माण होते.
२.समाजउपयोगीता: समाजाच्या गरजा व समस्या सोडवण्यास मदत करणे.
३.मर्यादित स्वरुपात उत्पादन :असा उद्देश नव्हे तर विद्यार्थीत प्राथमिक कौशल्य निर्माण होणे आवश्यक .
४.समान अनिवार्य उपक्रम : दैनदिन उपक्रम ,नैमितिक उपक्रम ,सांस्कृतिक उपक्रम,राष्ट्रीयसण व उत्सव इत्यादी समान अनिवार्य उपक्रम ठेवण्यास आले आहे.
५.उद्योग मुलक क्षेत्र : उत्पादन कार्यातून ज्ञान सामजस्य ,कौशल्य वृत्ती,ही मूल्य जोपासना येतात.
६.कार्यक्रमाचे स्वरूप:
कार्यानुभव तासिकाची इयत्तावाऱ विभागणी केली आहे.
१.उपक्रम-समान अनिवार्य उपक्रम १ ते ५ तासिका १०८ व ६ ते ८ वी तासिका ५० आहेत .
२.उपक्रम-प्रसंगोपात सोपे उपक्रम १ ते ५ तासिका ३६ व ६ ते ८ वी तासिका ३० आहेत .
३.उपक्रम-उत्पादन उपक्रम १ ते ५ तासिका १४४ व ६ ते ८ वी तासिका ८० आहेत .
१२.कार्यानुभवाचे उद्दिष्टे व त्याचे स्पष्टीकरणे :
१.समाजाच्या गरजा व समस्या ओळखण्यास मदत .
२.समाजातील उत्पादन कार्याची ओळख .
३.समाजातील उत्पादन प्रक्रिया व कौशल्याची ओळख .
४.सामाजिक समस्याची जागृती.
५.समाजसेवा व उत्पादन कार्य याची उपयुक्तता .
६.समाजातील उत्पादन कार्याचे नियोजन .
७.समाजातील उत्पादन परिस्थिती स्वताची भूमिका ओळखणे .
८.कच्चा मालाची माहिती करून देणे.
९.परिसर व समाज याबद्दल जवळीक जबाबदारी बांधलकी .
१०.शारीरिक काम व कामकरणारे लोकाबद्दल आदर.
मुख्य पृष्ठ